'तान्हाजी' चित्रपटातल्या चुलत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून व्हाल आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:06 PM2022-01-11T14:06:07+5:302022-01-11T14:15:23+5:30

'तान्हाजी द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे (Kailash Waghmare) या चित्रपटात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. त्याला या भूमिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

अभिनेता कैलाश लीला वाघमारे उत्तम अभिनेता असण्यासोबतच गायक एक चांगला लेखकही आहे. त्याच्या कथा-कविता प्रकाशित झाल्या आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का कैलाश वाघमारेप्रमाणेच त्याची पत्नीसुद्धा अभिनेत्री आहे. मीनाक्षी राठोड असे तिचे नाव आहे.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मीनाक्षीने पंचबाईंची भूमिका साकारली आहे.

मालिकाच नाहीतर सिनेमातही ती झळकली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ सिनेमातही ती झळकली आहे.

मीनाक्षी आणि कैलास दोघांनीही एकत्र काही नाटकातही काम केले आहे. मीनाक्षीसुद्धा मुळची जालन्याचीच आहे.

कैलास आणि मीनाक्षी दोघांनीही मुंबईत आल्यानंतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये सहभाग घेतला होता.

तिथून त्यांना संधी मिळायला सुरुवात झाली आणि आज दोघांनीही इंडस्ट्रीत आपल्या अदाकारीने रसिकांची पसंती मिळवली आहे.

विशेष म्हणजे मीनाक्षी खर्‍या आयुष्यात प्रचंग ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिच्या विविध अदा पाहायला मिळतील.

इतकंच काय तर कैलाश आणि मिनाक्षी सोशल मीडियावर कपल गोल देत असतात.

चाहतेही या जोडीला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती देत असतात.