Ganeshostav 2022 : मराठी कलाकारांचे ‘कलावंत पथक’ सज्ज, पहा कोणकोणते सेलिब्रिटी करणार बाप्पाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:55 PM2022-08-30T12:55:15+5:302022-08-30T13:01:43+5:30

Ganeshostav 2022 : बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.

बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी ढोल ताशांचा सराव सुरू झाला असून ही तयारी आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मग अशावेळी मराठमोळे कलाकार कसे मागे राहतील. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.

२०१४ साली श्रुती मराठे, सौरभ गोखले, आस्ताद काळे यांनी एकत्र येऊन या पथकाची सुरुवात केली होती. यंदाच्या वर्षी या पथकाला ८ वर्षे पूर्ण होत आहेत.

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या स्वागताच्या मिरवणुकीत कलाकारांची मांदियाळी म्हणजे पुणेकरांसाठी एक आकर्षणच ठरले आहे.

ही सर्व कलाकार मंडळी एकाच ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळत असल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी जमलेली असते.

कलावंत ढोल ताशा पथकाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची साथ मिळत असते.

शूटिंग निमित्त काही कलाकार ईच्छा असूनही सहभागी होऊ शकत नाहीत तेव्हा हे सेलिब्रेशन ते खूप मिस करताना दिसतात.

या पथकाचा सराव काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला त्यावेळी श्रुती मराठेने त्याचे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले होते.

जवळपास दोन महिन्यांपासून नूतन मराठी विद्यालय परिसरात ही सर्व कलाकार मंडळी एकत्र जमून हा सराव करताना दिसत आहेत.

श्रुती मराठे, पल्लवी पाटील, सौरभ गोखले, अनुजा साठे, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, कश्मिरा कुलकर्णी, आर जे सोनाली, अक्षय वाघमारे, स्नेहलता वसईकर, शाश्वती पिंपळीकर, अशी बरीचशी नामवंत कलाकार मंडळी तसेच बॅक आर्टिस्टही या पथकात सहभागी झालेली पाहायला मिळतात.

ही कल्पना आस्ताद काळे आणि सौरभ गोखले यांना सुचली त्यावेळी अनेक कलाकारांनी त्यांना साथ देण्याची तयारी दर्शवली.