सई लोकूरचा व्हेकेशन मूड ऑन; नवऱ्यासोबत फूल एन्जॉय करतीये मालदीव ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:51 PM2021-10-07T20:51:12+5:302021-10-07T20:55:04+5:30

Sai lokur: सई कायमच वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. कलाविश्वाप्रमाणेच सई सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. (फोटो : सई लोकूर इन्स्टाग्राम पेज)

सई अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत तिच्या पर्सनल लाइफमधील काही क्षणदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते.

३० नोव्हेंबर २०२० रोजी सईने तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून सई तिच्या नवऱ्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

सई कायमच वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

सध्या सई तिच्या नवऱ्यासोबत मालदीवला व्हेकेशनसाठी गेली असून तिथले काही फोटो तिने शेअर केले आहेत.

मालदीवमध्ये धमाल करतानाचे अनेक फोटो सईने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सई आणि तीर्थदीपची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर साईटवर झाली आहे.

सई आणि तीर्थदीपने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.

लग्नानंतर प्रत्येक सण, उत्सवाचे किंवा तिच्या पिकनिकचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.