वाढदिवशी धुरळा, अभिनेता प्रसाद खांडेकरने दोन-चार नाही, कापले आठ केक; See Photos!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:59 PM2024-05-08T12:59:01+5:302024-05-08T13:06:27+5:30

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) शोने रसिकांच्या मनात घर केले आहे. या माध्यमातून अनेक कलाकार घराघरात पोहचले आहेत. यातील अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) हा कायमच चर्चेत असतो.

नुकतेच प्रसादने 5 मे रोजी आपला वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रसाद खांडेकरने वाढदिवस आपल्या कुटुंबियांसह मित्र मंडळीबरोबर साजरा केला. यावेळी त्यानं एक नाही तर आठ केक कापले आहेत.

याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर प्रसादने खास पाणीपुरी पार्टी ठेवली होती. याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

या खास दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या कलाकारांचे, चाहत्यांचे आभार मानण्यासाठी प्रसादने नुकतीच पोस्ट लिहिली आहे.

पोस्टमध्ये त्यानं लिहलं, नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ५ मेला माझ्या वाढदिवसादिनी तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा मला पाठवल्या…योगायोगाने ५ मे हा जागतिक हास्यदिन म्हणून सुद्धा साजरा केला गेला…यामुळे आनंद द्विगुणित झाला…तुम्ही भरभरून पाठवलेले केक्स, गिफ्ट्स आणि बुकेज शुभेच्छा सगळं व्यवस्थित पोहोचलं''

पुढे त्यानं लिहलं, 'रात्री १२ वाजता केक कापून सुरू झालेला वाढदिवस…वाड्या काकाच्या फोनपासून प्रवास करत हास्यजत्राच्या सेटवर पाणीपुरी पार्टी करत आणि रात्री घरच्याबरोबर डिनर, दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता परत केक कापून संपवला…'.

प्रसाद पुढे म्हणाला, 'वाढदिवसादिनी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी काम करायला मला खूप आवडत सो यंदा ही ५ तारखेला हास्याजत्राचं शूट करत असल्यामुळे थोडा व्यग्र होता. पण जमेल तेवढं प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला…ज्यांना केला नसेल त्यांचे आभार मानतो आणि एकच प्रार्थना करेन असाच आशीर्वाद व प्रेम ठेवा…तुमचं हे प्रेम आणि शुभेच्छा प्रचंड ऊर्जा, समाधान आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. देव सगळ्यांना खुश ठेवो'.

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. प्रसाद खांडेकरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्टची माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो.

प्रसादने अनेक नाटकांचं दिग्दर्शनही केलं आहे. हास्यजत्रेतील अनेक स्किटचं प्रसाद लेखन आणि दिग्दर्शन करतो.