डोलू आणि...; रितेश-जेनेलियाची टोपणनावं माहितीयेत का? एकमेकांना या नावाने मारतात हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:19 PM2023-07-24T16:19:22+5:302023-07-24T16:25:04+5:30

Riteish deshmukh: या नावामुळे त्यांच्या घरात खूप गोंधळ झाला होता.

महाराष्ट्राचं लाडकं कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. २०१२ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली आणि आजपर्यंत सुखाने संसार करत आहेत.

कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं.

रितेश-जेनेलिया यांच्याविषयी कोणतीही माहिती असली तरीदेखील ती वाऱ्यासारखी पसरते.

रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते एकमेकांसोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतात.

सध्या जेनेलिया तिच्या ट्रायल पीरियड या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यानिमित्ताने तिने एक मुलाखत दिली.

जेनेलियाने अलिकडचे झूम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं.

या मुलाखतीमध्ये तिने रितेश आणि ती एकमेकांना कोणत्या टोपणनावाने हाक मारतात हे सुद्धा सांगितलं.

रितेश जेनेलियाला जीन्स या टोपणनावाने हाक मारतो. या नावामुळे त्यांच्या घरात खूप गोंधळ झाला होता. या नावामागचा अर्थ कोणाचा ठिकसा माहित नाही.

तर, जेनेलियादेखील रितेशला एका खास नावाने हाक मारते. ती रितेशला डोलू या नावाने हाक मारते.

अलिकडेच या दोघांचा वेड हा सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ मध्ये दिसणार आहे. तर, जेनेलियाचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित झाला.