‘कोई मिल गया’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली बालकलाकार हंसिका मोटवानी काळानुसार इतकी बदलली, दिसते फारच ग्लॅमरस...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:12 AM2021-03-31T11:12:36+5:302021-03-31T11:24:46+5:30

Hansika started her career from television shows & got chance to act in bollywood later on...

'शाकालाका बूम बूम' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार हंसिका मोटवानी आज दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक मानली जाते.

अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.

अगदी गोंडस दिसणारी हंसिका आता ग्लॅमरस दिसू लागली आहे. हंसिका ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन दोन्ही ठिकाणी ग्लॅमरस दिसते. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

हंसिकाने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून डेब्यू 'आपका सुरूर' या चित्रपटाद्वारे केलं होतं.तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला होता.

याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती आणि तिने स्वत:पेक्षा 18 वर्षे मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला होता.

‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून सर्वच हैराण झाले होते. मग काय यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.

लवकर मोठे होण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे याकाळात बोलले गेले होते. हंसिकाची आई स्किन स्पेशालिस्ट आहे.

तिनेच हंसिकाला ग्रोथ हार्मोनल इंजेक्शन दिलेत, अशी चर्चाही रंगली होती. अर्थात हंसिकाने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही.

हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. होय, चाहत्यांनी मदुराईमध्ये तिचे मंदिर बनवले आहे. यात हंसिकाची मूर्ती आहे.

हंसिका सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. हंसिका वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हंसिका बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येच दिसली आहे. मात्र तिने साऊथचे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.