ही आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल, एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा घेते जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:58 PM2024-04-04T13:58:53+5:302024-04-04T14:04:20+5:30

बॉलिवूड चित्रपटांमधील डान्स नंबर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. अनेक अभिनेत्री आयटम साँग करताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का बी टाऊनची सर्वात महागडी आयटम गर्ल कोण आहे.

बॉलिवूड चित्रपटांमधील डान्स नंबर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. अनेक अभिनेत्री आयटम साँग करताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का बी टाऊनची सर्वात महागडी आयटम गर्ल कोण आहे.

पन्नासच्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील आयटम साँग प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हेलन आणि बिंदू सारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या डान्स नंबरने चित्रपट हिट केलेत. आजही चित्रपटांमध्ये हा ट्रेंड सुरू आहे आणि दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक आयटम साँग ठेवतात. पण आज बॉलिवूडमध्ये सर्वात महागडी डान्स नंबर करणारी अभिनेत्री कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? विशेष म्हणजे ती चित्रपटातील मुख्य नायिकेपेक्षा जास्त फी घेते.

ही दुसरी कोणी नसून सनी लिओनी आहे. सनी सध्या हिंदी चित्रपटातील आयटम साँगसाठी सर्वाधिक फी घेणारी आयटम गर्ल मानली जाते.

डीएनए रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर 'रईस' या चित्रपटातील तिच्या 'लैला' या डान्स नंबरसाठी अभिनेत्रीने ३ कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम तिला चित्रपटात केवळ ४ मिनिटांच्या गाण्यासाठी देण्यात आली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, सनी लिओनीने रागिनी एमएमएस २ सिनेमातील बेबी डॉल गाण्यासाठी जास्त मानधन घेतले होते. मात्र या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तिने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते, हे समजू शकलं नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, सनी एका गाण्यासाठी डान्सिंग क्वीन नोरा फतेहीपेक्षा जास्त मानधन घेते. ती तिच्या प्रत्येक गाण्यासाठी २ कोटी रुपये मानधन घेते.

कतरिना कैफ, करीना कपूर आणि जॅकलिन फर्नांडिससारख्या टॉप अभिनेत्रीदेखील एका गाण्यासाठी दीड ते दोन कोटी मानधन घेतात.

सनी लिओनी भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारी आयटम गर्ल नाही.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पुष्पा द राइज चित्रपटातील ओ अंटावा या आयटम नंबरसाठी ५ कोटी रुपये घेतले होते. अशारितीने ती भारतातील सर्वात महागडी आयटम गर्ल बनली आहे.