साऊथचा सुपरस्टार धनुषचा 'सर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 04:37 PM2022-09-19T16:37:15+5:302022-09-19T16:37:15+5:30

धनुष स्टारर 'सर' यावर्षी 2 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

तमिळ आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी या चित्रपटाचे शूटिंग होत आहे,चित्रपट निर्मात्यांनी ही माहिती दिली. (फोटो इन्स्टाग्राम)

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, निर्मिती कंपनी 'सितारा एंटरटेनमेंट्स'ने लिहिले की, "तारीख लक्षात ठेवा. 'सर' 2 डिसेंबर 2022 पासून शिकवायला येत आहेत." (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात अभिनेत्री संयुक्ता मेननही दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेता धनुषची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये खूप आहे आणि चाहते त्याच्या आगामी सर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)