कधी अभिनेत्याला केलं डेट तर कधी दिग्दर्शकावर जडलं प्रेम! साउथच्या सुपरस्टारच्या प्रेमापायी आजही ही अभिनेत्री आहे सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:55 PM2023-11-29T15:55:50+5:302023-11-29T15:58:14+5:30

एकेकाळी अभिनेत्रीचे नाव अभिनेत्यांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वांशी जोडले गेले होते.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे, सध्या ती OTT प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. हम साथ साथ हैं, दे दे प्यार दे, अंधाधुंद, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या तब्बूचे करिअर चांगले होते पण प्रेमाच्या बाबतीत अभिनेत्रीला तिच्या नशीबाने साथ दिली नव्हती आणि आज ती ५२ वर्षांची असूनही ती सिंगल आहे.

एकेकाळी तब्बूचे नाव अभिनेत्यांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वांशी जोडले जात होते. तब्बूबद्दल बातम्या आल्या होत्या की, अभिनेत्री संजय कपूरला डेट करत आहे. दोघांनी 'प्रेम' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. पण दुर्दैवाने चित्रपटाचे शूटिंग संपताच या प्रेमही संपले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द संजय कपूरनेच हा खुलासा केला होता.

संजय कपूरनंतर दिग्दर्शक-निर्माता साजिद नाडियादवाला यांनी तब्बूच्या आयुष्यात प्रवेश केला. साजिदची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या भारतीच्या निधनानंतर तब्बूने 'जीत' चित्रपटात काम केले. याच काळात दोघांमध्ये प्रेम फुलले.

पण साजिद दिव्याला आपल्या मनातून विसरू शकला नाही आणि त्यामुळेच तो तब्बूशी कमिटमेंट देताना कचरत होता. अशा परिस्थितीत तब्बूने साजिदकडे पाठ फिरवली आणि त्यानंतर साऊथचा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनने तिच्या हृदयात स्थान निर्माण केले.

नागार्जुनवर प्रेम करणे ही कदाचित तब्बूच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. कारण नागार्जुन आधीच विवाहित होता आणि असे असूनही तो आणि तब्बू एकमेकांच्या जवळ आले.

तब्बू नागार्जुनसोबत १० वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिली आणि नंतर तिला समजले की नागार्जुन आपल्या पत्नीला तिच्यासाठी सोडणार नाही. यानंतर तब्बूने नागार्जुनपासून दूर झाली, मात्र त्यानंतर ती कोणत्याही नात्यात आली नाही आणि अजूनही ती सिंगल आहे.

टॅग्स :तब्बूTabu