शत्रूघ्न सिन्हापेक्षा कैकपटीने डॅशिंग आहे त्यांचा लेक; पाहा सोनाक्षीच्या सख्ख्या भावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:12 PM2022-05-06T16:12:45+5:302022-05-06T16:18:16+5:30

Shatrughan sinha: लवच्या प्रत्येक फोटोवर नेटकरी तुफान कमेंट करत असून यात फिमेल चाहत्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं.

आपल्या डॅशिंग अंदाज आणि भारदस्त आवाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे शत्रूघ्न सिन्हा.

आजही शत्रूघ्न सिन्हा त्यांच्या दमदार डायलॉग्समुळे ओळखले जातात.

शत्रूघ्न यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेक सोनाक्षी सिन्हा हिनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सोनाक्षीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

सोनाक्षीप्रमाणेच शत्रूघ्न सिन्हा यांना लव आणि कुश ही दोन मुलंदेखील आहेत. मात्र, त्यांचा सोशल मीडियावर फार कमी वावर असतो.

यामध्येच सध्या शत्रूघ्न सिन्हा यांचा लेक लव सध्या सोशल मीडियावर चर्चिला जाऊ लागला आहे.

सध्या सोशल मीडियावर लवचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात तो प्रचंड डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.

लवच्या प्रत्येक फोटोवर नेटकरी तुफान कमेंट करत असून यात फिमेल चाहत्यांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं.

लव सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तो शत्रूघ्न सिन्हा वा त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो.

मध्यंतरी लव, बिग बॉस फेम पूजा मिश्रामुळे चर्चेत आला होता. पूजाने त्याच्यावर अनेक आरोप केले होते.

पूजाच्या आरोपांवर लवने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत हे आरोप फेटाळून लावले होते.