MBBS डॉक्टर आहे साई पल्लवी तर समांथाकडे आहे ही डिग्री, जाणून साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:31 PM2022-11-29T12:31:49+5:302022-11-29T12:35:57+5:30

साऊथ चित्रपटांच्या या १० अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?, जाणून घ्या याबद्दल...

तमिळ चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी एमबीबीएस डॉक्टर आहे. तिने Tbilisi State Medical University मधून डॉक्टरचे शिक्षण घेतले आहे.

दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नूने संगणक क्षेत्रात अभियंता पदवी प्राप्त केली आहे.

दक्षिण चित्रपट अभिनेत्री सामंथा अक्किनेनी देखील तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करते. ती वाणिज्य शाखेत पदवीधर आहे.

तमिळ चित्रपट अभिनेत्री त्रिशा कृष्णनला क्रिमिनल साइकोलॉजिस्टमध्ये शिक्षण घ्यायचे होते. त्रिशा बीबीएची पदवीधर आहे.

दक्षिण चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने मास मीडियामध्ये पदवी प्राप्त केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मार्केटिंग आणि अॅडव्हर्टायझिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

लष्करी पार्श्वभूमीतून आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंगही सुशिक्षित आहे. अभिनेत्रीने दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात पदवी घेतली आहे.

दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरनही अभ्यासात चांगली होती. तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बीए साहित्य केले आहे.

तमिळ चित्रपटांची लेडी सुपरस्टार नयनतारा देखील पदवीधर आहे. त्यांचे शालेय शिक्षण मार्थोमा कॉलेजमधून झाले.

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने कला क्षेत्रात पदवी घेतली आहे.