यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:33 PM2024-01-09T19:33:32+5:302024-01-09T20:22:02+5:30

यंदा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या फेब्रुवरीमध्ये ते साखरपूडा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेते विजय वर्मा दोघेही एकमेंकाच्या प्रेमात बुडाले आहेत. तेही 2024 मध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.

अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसांपासून एकमेंकाना डेट करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 2024 मध्ये लग्न करू शकतात.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळत आहे.

अभिनेत्री सबा आझाद आणि हृतिक रोशन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना अनेकदा विविध कार्यक्रम आणि विमानतळांवर एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. नुकतेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून दोघे मुंबई विमानतळावर परतले. ते दोघेही यंदा लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत. कॉफी विथ करणमध्येही जान्हवीने शिखरबाबत भाष्य करत त्याला फॅमिली मॅन म्हटलं होतं. आता यांच्या लग्नाचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, पण दोघांनी आतापर्यंत जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी यंदा लग्नबंधनात अडकणार आहेत. मागील जवळपास तीन वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दोघं अनेकदा अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र दिसतात.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचं नाव बाहुबली स्टार प्रभासशीही जोडलं गेलं होतं. एवढंच नाही तर प्रभासने अनुष्का शेट्टीचं लग्नही मोडलं होतं असं बोललं जातं. डेटिंगच्या बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या.