कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:12 PM2023-06-07T17:12:26+5:302023-06-07T17:27:34+5:30

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता.

अभिनेते कबीर बेदी त्यांच्या चित्रपटांसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. जेव्हा अभिनेत्याने वयाच्या 70 व्या वर्षी चौथे लग्न केले तेव्हा त्यांची मुलगी पूजा बेदीचा राग अनावर झाला होता.

कबीर बेदी सुमारे दहा वर्षे परवीन दोसांझसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या नात्याला नवीन नाव दिले.

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता.

कबीर बेदी यांनी तीन लग्नानंतर 70 व्या वाढदिवसाला 2016 मध्ये मॉडेल परवीन दोसांझशी लग्न केले. या लग्नानंतर इंडस्ट्रीत चांगलाच गदारोळ झाला होता. त्याचवेळी कबीर बेदी यांच्या घरातही बराच वाद झाला होता. या लग्नाबद्दल अभिनेत्याची मुलगी आणि अभिनेत्री पूजा बेदीने संताप व्यक्त केला होता.

यासंदर्भात पूजा बेदीने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. ज्यात तिने परवीन दोसांझला टॅग करून खरी-खोटी सुनावली होती. पूजाने तिच्या सावत्र आईचा उल्लेख चेटकीण म्हणून केला होता.

पूजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "प्रत्येक परीकथेत एक दुष्ट जादूगार किंवा दुष्ट सावत्र आई असते! माझ्याकडे नुकतेच तिचे आगमन झाले आहे! माझ्या वडिलांनी परवीन दुसांझशी लग्न केले आहे." पूजाने अशी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. पूजा बेदीच्या या ट्विटमुळे कबीर बेदी आणि त्यांची चौथी पत्नी परवीन यांना खूप ट्रोल करण्यात आले होते.

हे प्रकरण चिघळत आहे हे लक्षात येताच पूजाने समजूतदारपणा दाखवत हे ट्विट डिलीट केले आणि त्यानंतर नवीन ट्विटमध्ये वडील आणि सावत्र आईला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

या घटनेनंतर पूजा बेदी आणि कबीर बेदी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि वडील आणि मुलगी बराच काळ एकमेकांशी बोलले नाहीत.