लग्नानंतर बायकोला धोका दिला! नवाजुद्दीन सिद्दीकीचा कॅफेमधल्या महिला वेटरसोबत 'वन नाईट स्टँड', म्हणाला- "ती माझ्याकडे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:15 IST2026-05-19T14:10:53+5:302026-05-19T14:15:01+5:30
न्यूयॉर्कमध्ये असताना वन नाईट स्टँड केल्याचा धक्कादायक खुलासा नवाजुद्दीनने केला होता.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. आज नवाजुद्दीन त्याचा ५२वा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनयासोबतच नवाजुद्दीन त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. न्यूयॉर्कमध्ये असताना वन नाईट स्टँड केल्याचा धक्कादायक खुलासा नवाजुद्दीनने केला होता.

एका पुस्तकात नवाजुद्दीनने म्हटलं होतं की २००६ ते २०१० या वर्षांत अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. हिट सिनेमांमुळे लोक त्याला ओळखू लागले होते.

त्याच दरम्यान नवाजुद्दीन त्याच्या मित्रासोबत न्यूयॉर्कला गेला होता. तिथल्या एका कॅफेमध्ये एक महिला वेटर त्याला भेटली.

नवाजुद्दीनने सांगितलं की ती महिला वेटर त्याच्याकडे टक लावून पाहत होती. थोड्यावेळाने तिने नवाजुद्दीनला विचारलं की तो अभिनेता आहे का?

त्यानंतर अभिनेत्याने तिला कोणता सिनेमा पाहिलास? असं विचारल्यावर तिने लंचबॉक्स चित्रपटाचं नाव घेतलं होतं.

त्यानंतर खूप वेळ ते दोघे गप्पा मारत होते. तेव्हा नवाजुद्दीनचं लग्न झालं होतं. असं असूनही त्या महिला वेटरसोबत वन नाईट स्टँडची कबुली नवाजुद्दीनने दिली होती.

जे न्यूयॉर्कमध्ये झालं ते तिथेच राहिलं, असंही नवाजुद्दीन म्हणाला होता.

















