अश्विनी भावे यांनी बॉलिवूडकरांसोबत साजरी केली धुळवड; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 02:33 PM2024-03-26T14:33:01+5:302024-03-26T14:36:45+5:30

Ashvini bhave: अश्विनी भावे यांनी जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासोबत होळी सेलिब्रेशन केलं.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे (ashvini bhave). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अश्विनीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.

अश्विनी भावे यांनी मराठीसह अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम त्यांच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात.

नुकतीच अश्विनी यांनी होळी, धुळवड साजरी केली. या सेलिब्रेशनचे काही फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अश्विनी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या शबाना आझमी यांच्यासोबत दिसून येत आहेत.

जावेद अख्तर आणि अश्विनी भावे यांनी शेअर केलेला खास फोटो

अश्विनी भावे आणि नीना गुप्ता यांचा कूल सेल्फी