महेश मांजरेकरांच्या मुलीचे Bold फोटो पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 06:00 AM2021-01-03T06:00:00+5:302021-01-03T06:00:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने ‘दबंग ३’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

पहिलाच सिनेमा तो ही सलमान खानच्या ‘दबंग 3’ मधून सई मांजरेकर बॉलिवूड पदार्पण होणार होते म्हणून तिची तुफान चर्चा झाली.

सिनेमात झळकण्यापूर्वीच सई लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता अधिक होती. नुकतेच सईने देखीलन तिचा बोल्ड फोटो शेअऱ करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'दबंग ३' सिनेमात काम करण्याची मिळालेल्या संधीबद्दल सई म्हणाली की, ज्यावेळी मला दबंग ३ मिळाला होता.

तो दिवस मी नेहमी लक्षात ठेवेन. सलमान सरांसोबत काम करायला मजा आली आणि त्यांनी मला खूप काही शिकवले जे नेहमी माझ्या स्मरणात राहील.

मला सलमान खान सई अशीच हाक मारत होते. फक्त आई सेटवर असताना ते मला जीव म्हणून हाक मारायचे. कारण मला घरी जीव अशी हाक मारतात.

सईचे अगोदरचे फोटो पाहिले असता ती गोलमटोल होती पण आता सईने वजन कमी करत फिट अॅण्ड फाईन दिसत आहे.

सध्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले तीचे फोटो पाहता ती आता पूर्णपणे ग्लॅमदीवा दिसत आहे.

सईचे विविध अंदाजातील ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

कमीत कमी मेकअप, स्टायलिश ड्रेस आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज असलेला सईचे हे फोटो कुणालाही घायाळ करतील असेच आहेत.

सईने सोशल मीडियापासून काही दिवस दूर असली तरी तिच्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा चांगलीच फळाला आली आहे.