लिसा हेडनने १६ वर्ष जुन्या स्विमसूटमध्ये दिल्या बोल्ड पोझ, वयाच्या १९व्या वर्षी विकत घेतला होता हा ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:15 PM2022-04-01T18:15:30+5:302022-04-01T18:15:30+5:30

Lisa Haydon: लिसा हेडन बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २०१६ साली ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात शेवटचे काम केले होते.

अभिनेत्री लिसा हेडन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. हल्ली ती फोटो आणि व्हि़डीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच लिसा हेडनने इंस्टाग्रामलर पूलच्या किनारी ब्लॅक अँड व्हाइट रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे आणि त्याचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

३५ वर्षीय लिसाने १६ वर्षे जुना स्विमसूट परिधान केला आहे. मात्र असे वाटते की जणू तिने हा कालच विकत घेतला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत लिसाने लिहिले की, जेव्हा मी १९ वर्षांची होती तेव्हा मी हा स्विमसूट विकत घेतला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत लिसा हेडन वेगवेगळ्या पोझ देताना दिसते आहे आणि या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लिसा हेडन बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २०१६ साली ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात शेवटचे काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

लिसाने ऑक्टोबर २०१६ मध्ये डिनो लालवानीसोबत लग्न केले आणि तिला तीन मुले आहेत जॅक आणि लियो आणि मुलगी लारा. (फोटो: इंस्टाग्राम)