जॉनी लिव्हरची लेक जेमीला पाहिलंत का? सुपरटॅलेंटेड पण १२ वर्षांपासून करतेय स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 08:56 AM2023-03-14T08:56:52+5:302023-03-14T09:06:58+5:30

जॉनी लिव्हरची मुलगी असुनही स्वत:च्या टॅलेंटच्या जोरावर करतेय फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल. वडिलांसारखीच आहे विनोदी.

स्टारकिड्सला नेहमीच नेपोटिझमच्या तराजूतल ठेवलं जातं. स्टारकिड्सवरुन सतत वाद सुरुच असतात. अनेक स्टारकिड्स असे आहेत जे टॅलेंटेड आहेत मात्र त्यांना अजून इंडस्ट्रीत ओळख मिळालेली नाही. जे अजुनही स्ट्रगलच करत आहेत. त्यातलीच एक कॉमेडी अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लीव्हर. (Jamie Lever)

जेमीने २०१२ सालापासून करिअर ला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार जेमी लीव्हरने आधी मार्केट रिसर्च एजंसीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. मात्र तिला काहीतरी मोठं करायचं होतं.यानंतर तिने स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. ती नेहमी तिच्या इन्स्टाग्राम रील्समधून चाहत्यांना खळखळून हसवते.

जेमी बॉलिवूड स्टार्सची नक्कलही करते. तिचे मिमिक्रीचे व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक जेमीचा अभिनय, कॉमेडी, आणि मिमिक्री फार आवडीने पाहतात. जेमी सुपरटॅलेंटेड आहे मात्र तरी तिला योग्य ती ओळख मिळालेली नाही.

१२ वर्ष झाली तरी जेमी अजून इंडस्ट्रीत स्ट्रगलच करत आहे. तिचे वडील जॉनी लिव्हर कॉमेडीचे बादशाह आहेत.त्यांनी मोठमोठ्या दिग्गजांसोबत काम केले आहे. मात्र तिने कधीच या गोष्टीचा फायदा घेतला नाही. ती तिच्या टॅलेंटवरच पुढे जात आहे.

जेमीने एका मुलाखतीत सांगितले होते की सेलिब्रिटीची मुलगी असणं म्हणजे तुम्हाला सगळंच मिळेल असं नाही. तुम्हाला सिनेमे मिळतीलच याची गॅरंटी नाही. माझा करिअर ग्राफ याचं उत्तम उदाहरण आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नशीब. माझ्या नशीबातच वाट पाहणं लिहिलं आहे.

वडील सुपरस्टार असल्याचा मला काहीच फायदा मिळाला नाही. त्यांनी कधीच माझ्यासाठी त्यांची ओळख वापरली नाही. त्यांनी जे काही यश मिळवलं ते त्यांच्या टॅलेंटवर. मी माझ्या टॅलेंटवरच करिअर बनवत आहे. आतापर्यंत मला जी काही ओळख मिळाली आहे मी त्यातच संतुष्ट आहे. अनेक जणांचं करिअर काही वर्षातच संपतं. मी हळूहळू पुढे जात आहे.

कॉमेडी आणि मिमिक्री शिवाय जेमीने दोन सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे.कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करु' या सिनेमात तिने काम केले होते. तसंच तिने 'हाऊसफुल 4' मध्ये काम केले आहे.

जेमी लवकरच आता कॉमेडी सीरिज 'पॉप कौन' मध्ये दिसणार आहे. पॉप कौनचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १७ मार्च पासून ही सिरीज हॉटस्टारवर बघायला मिळणार आहे.