वाढत्या वजनामुळे ट्रोल झालेल्या Harnaaz Sandhu चा पुन्हा बदलला लूक, फोटो बघाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:57 PM2022-04-27T14:57:22+5:302022-04-27T15:06:11+5:30

Miss Universe Harnaaz Sandhu : हरनाज संधू तिचे हे स्टायलिश फोटो शेअर करून तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आपल्या ग्लॅमरस लूकने तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सुंदरतेच्या बाबतीत तिची तुलनाच होऊ शकत नाही.

अपार सौंदर्य आणि बिनधास्त स्वभाव यामुळे मिस यूनिव्हर्स हरनाज संधू ही इतरांपेक्षा खूप वेगळी ठरते. हरनाजने २०२१ मध्ये मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकून भारताचं नाव चमकवलं. हरनाज जगभरातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असण्यासोबतच हुशार आणि ग्लॅमरसही आहे.

काही दिवसांपूर्वी हरनाजला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. पण हरनाज ट्रोलिंगकडे पॉझिटिव्हली बघितलं. अनेक निगेटिव्ह कमेंट्सनंतरही हरनाजने तिचे काही खास फोटो शेअर केलेत. जे बघून तिला ट्रोल करणारेही तिच्यावर फिदा होतील.

हरनाज नव्या फोटोंमध्ये पिंक कलरच्या थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. ब्युटी क्वीनने या ड्रेससोबत न्यूड ग्लॉसी लिपस्टिक, काजळ, मस्कारा, ब्लशर आणि हायलायटरने तिचा लूक पूर्ण केलाय.

एका दुसऱ्या फोटोत हरनाज सोफ्यावर बसून किलर पोज देत आहे. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास दिसत आहे.

आणखी तिच्या एका फोटोवर फॅन्स भरभरून प्रेम लुटवत आहेत. हरनाजच्या या फोटोला लाखो लोकांनी लाइक केलंय. फॅन्स भरभरून तिचं कौतुक करत आहेत.

हरनाजने तिचे हे स्टायलिश फोटो शेअर करून तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आपल्या ग्लॅमरस लूकने तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सुंदरतेच्या बाबतीत तिची तुलनाच होऊ शकत नाही.