Hansika Motwani : तू मैत्रिणीच्याच संसारात विष कालवलं...? त्या आरोपावर हंसिका मोटवानी स्पष्टच बोलली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:40 PM2023-02-10T17:40:09+5:302023-02-10T17:50:22+5:30

Hansika Motwani : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीनं ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खतुरियासोबत लग्नगाठ बांधली. सोहेलचं हे दुसरं लग्न आहे...

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीनं (Hansika Motwani) ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खतुरियासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची मोठी चर्चा झाली होती.

आता पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा आहे. कारण काय तर हंसिका व सोहेलच्या लग्नाची कहाणी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

या दरम्यान हंसिकाने अनेक खुलासे केले आहेत. हंसिकाने आपल्या मैत्रिणीचाच संसार मोडला, तिच्या संसारात विष कालवलं, असे अनेक आरोप तिच्यावर झालेत. आता तिने यावरही उत्तर दिलं आहे.

सोहेलचं हे दुसरं लग्न आहे. सोहेलचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं आणि त्यांच्या लग्नात हंसिका नाचतानाही दिसली होती.

नंतर सोहेल व रिंकी बजाज दोघांचा घटस्फोट झाला आणि पुढे हंसिकाने सोहेलशी लग्न केलं. हंसिकाने सोहेलशी लग्न करत असल्याची घोषणा केल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

हंसिकाने या ट्रोलिंगला आत्ता कुठे उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “लोकांसाठी माझ्याकडे बोट दाखवणे आणि मला व्हिलन ठरवणे खूप सोपं होतं. सेलिब्रेटी असण्याची मी ही किंमत मोजली.”

“त्यावेळी मी त्या व्यक्तीला ओळखत होते, याचा अर्थ ती माझी चूक होती असं नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही”, असंही ती म्हणाली.

हंसिकाचा नवरा सोहेल यावर बोलला. तो म्हणाला,''हंसिकासोबत लग्न करण्याआधी माझं पहिलं एक लग्न झालं होतं. पण हंसिकामुळे माझं पहिलं लग्न मोडलं असं म्हटलं गेलं. ते खूपच चुकीचं आणि अर्थहीन होतं''.

तो म्हणाला, “माझं पहिलं लग्न २०१४ मध्ये झालं होतं आणि ते फार कमी काळ टिकलं. पण फक्त माझी व हंसिकाची मैत्री असल्यामुळे आणि केवळ ती माझ्या पहिल्या लग्नात उपस्थित असल्याचे फोटो पाहून तिला ट्रोल केलं गेलं.”

“ अचानक हंसिकाला माझं लग्न मोडण्यास जबाबदार ठरवणाऱ्या बातम्या पाहून मला धक्का बसला होता. कारण असं काहीही नव्हतं. हंसिकाचा यात काहीही रोल नव्हता,”असंही तो म्हणाला.

हंसिका मोटवानीच्या लग्नावर 'लव्ह शादी ड्रामा' नावाचा एक शो डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम झाला आहे. याचा पहिला एपिसोड आज प्रदर्शित झाला.