Forbes India 30 Under 30 : जान्हवी कपूर, सारा अली खानला टाकलं मागे, 'या' बॉलिवूड सुंदरींनी थेट फोर्ब्समध्ये मिळवलं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:28 AM2024-02-16T11:28:32+5:302024-02-16T11:55:14+5:30

लहान वयात विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींची यादी फोर्ब्स इंडियाने जाहीर केली आहे.

२०२४ ची 'फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०' च्या (Forbes India 30 Under 30) ही यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या यादीत 30 वर्षांखालील 30 स्टार्सच्या नावांचा समावेश आहे, जे आपापल्या क्षेत्रात अप्रतिम काम करत आहेत.

यंदा यामध्ये चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील तीन अभिनेत्रींनी स्थान मिळवलं आहे. हे नाव जान्हवी कपूर किंवा सारा अली खानचे नाव नाही. तर यात एका दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने बाजी मारली आहे.

रश्मिका मंदान्नाचे नाव फोर्ब्सच्या यादीत आहे. रश्मिकाचे गेल्या वर्षी तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 2023 चा त्याचा पहिला चित्रपट 'वारीसू' होता. ज्यानं बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली. यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसली होती. हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज करण्यात आला.

याशिवाय 900 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या 'अ‍ॅनिमल'मध्ये रश्मिका होती. यामध्ये तिन रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केली. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती 'पुष्पा 2: द रुल', 'रेनबो', 'द गर्लफ्रेंड' आणि 'छावा' मध्ये दिसणार आहे.

Forbes India 30 Under 30 मध्ये स्थान मिळवणारी दुसरी अभिनेत्री आहे राधिका मदाना. टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत मोठी मजल राधिका मदानने मारली आहे. आज वयाच्या २८ व्या वर्षी राधिकाला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

2023 मध्ये अभिनेत्री तीन चित्रपटांमध्ये दिसली. वर्षाच्या सुरुवातीला ती आस्मान भारद्वाज दिग्दर्शित 'कुट्टी' या पहिल्या क्राईम ड्रामामध्ये दिसली होती. यामध्ये तिनं सहाय्यक भूमिका साकारली होती.

यानंतर 'कैची लिम्बु'मध्ये ती पाहायला मिळाली. यानंतर अभिनेत्री 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात झळकली. आता लवरकर राधिका 'सना' आणि 'सरफिरा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फोर्ब्सच्या यादीत तिसरे नाव आहे अदिती सेहगल उर्फ ​​डॉट हिचं. या यादीत ती सर्वात तरुण आहे. तिचे वय 25 वर्षे आहे.

आदिती गायिका आणि संगीतकार आहे. तिला डॉट या नावानेही ओळखले जाते. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातही तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. यात तिनं एथेल ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix India वर प्रदर्शित झाला.