चिमुरडीला ओळखलंत का?, विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर, वयाची ४०शी उलटूनही अद्याप आहे सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:12 PM2023-08-09T14:12:10+5:302023-08-09T14:20:01+5:30

फोटोतली ही चिमुरडी एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती.

निरागस दिसणारी ही चिमुरडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पहिल्याच चित्रपटातून ती हिट झाली आणि बॉलिवूडमधील नंबर वनची स्टार झाली. मात्र ती सिनेइंडस्ट्रीत फारशी कमाल दाखवू शकली नाही.

दोन अफेयर नंतर ब्रेकअपमुळे तिच्या करिअरवर गंभीर परिणाम झाला. पुन्हा एकदा ही अभिनेत्री बॉलिवूडवर गदर करण्यासाटी सज्ज झाली आहे. ओळखलंत का या फोटोतील मुलीला?

ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अमिषा पपटेल आहे. अमिषा पटेल गदर २मधून रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे.

अभिनेत्रीने कहो ना प्यार है मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर हृतिक रोशनच्या करिअरला कलाटणी मिळाली. पण अमिषाचं करिअर धीम्या गतीने सुरु राहिले.

यादरम्यान दिग्दर्शक विक्रम भटसोबत पाच वर्षे त्यांच्या अफेयरचे वृत्त ऐकायला मिळाले. त्याच्या सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमिषाचे लंडनमधील बिझनेसमन कानव पुरीवर जीव जडला. मात्र करिअरसाठी ती त्याच्यापासून दूर झाली. तरीदेखील तिच्या करिअरची गाडी रुळावर येऊ शकली नाही.

दरम्यान, रणबीर कपूर आणि अमिषा पटेल यांच्या लिंकअपचीही चर्चा झाली होती. रणधीर कपूर यांच्या ७०व्या वाढदिवसादरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एकत्र दिसले होते., फोटो क्लिक झाले आणि व्हायरल झाले. यानंतर एका पार्टीत अमिषा पटेलने रणबीर कपूरशी एकट्याने बोलण्याचा प्रयत्न केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर उगाच चर्चा होऊ नये म्हणून पार्टी सोडून बाहेर गेला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिषा पटेलचे विवाहित विक्रम भटसोबत नाते होते आणि जेव्हा तिच्या आई-वडिलांना त्यांच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा त्यांना अजिबात पटले नाही.

पत्रकार परिषदेत याचा उल्लेख करताना अमिषाने सांगितले की, तिच्या आईला जेव्हा हे कळले तेव्हा तिने तिला चप्पलने मारहाण केली.

अमिषा पटेल गदर २ मध्ये झळकणार आहे. ती यात सकीनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.