परी म्हणू की सुंदरा... दिशा पाटनीच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा; चाहत्यांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 05:54 PM2024-03-28T17:54:27+5:302024-03-28T18:06:16+5:30

दिशा पाटनी चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे इंटरनेटवर अधिक चर्चेत असते.

बॉलिवूडची ॲक्शन गर्ल दिशा पाटनी नुकतीच योद्धा या चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.

दिशा पटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

पुन्हा एकदा दिशा पटनीने तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

दिशा पाटनीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये दिसते की दिशा पाटनीने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

ग्लॅम मेकअप, न्यूड लिपस्टिकसह नाजुक कानातले घालून तिने तिचा लूक पूर्ण केला होता.

यासोबतच अभिनेत्रीने अँकलेट देखील परिधान केले आहेत.

या आउटफिटमध्ये दिशा खूपच सिझलिंग लूक देत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

दिशाची स्टाइल पाहण्यासारखी आहे. फोटोंमध्ये दिशा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

दिशा लवकरच प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटात दिसणार आहे.