Dhanush-Mrunal: धनुष अन् मृणाल ठाकूर यांच्या वयात किती आहे अंतर? रंगल्या डेटिंगच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:04 IST2025-08-05T14:56:04+5:302025-08-05T15:04:07+5:30
धनुष आणि मृणाल एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये?

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) 'सन ऑफ सरदार २'सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्यांदाच ती अजय देवगणसोबत झळकत आहे. या रोमँटिक कॉमेडी सिनेमासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत.
दरम्यान सिनेमाच्या स्क्रीनिंगला साउथ अभिनेता धनुषनेही (Dhanush) हजेरी लावली. यावेळी धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्यातील जवळीक पाहून दोघं डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
धनुषने २००४ सालीच 'थलायवा' रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केलं होतं. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलंही आहेत.
लग्नानंतर १८ वर्षांनी धनुष आणि ऐश्वर्याने एकमेकांसोबत वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट जाहीर केला आणि सर्वांनाच धक्का बसला. धनुषचं त्याच्या दोन्ही मुलांवर मात्र खूप प्रेम आहे.
आता मृणाल ठाकूरसोबतच्या डेटिंगच्या चर्चांमुळे धनुष चर्चेत आला आहे. दोघं खरंच एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत का? तसं असेल तर त्यांचे चाहते मात्र चांगलेच खूश झालेत.
धनुष ४२ वर्षांचा असून मृणाल ठाकूर ३३ वर्षांची आहे. दोघांमध्ये ९ वर्षांचं अंतर आहे. त्यांचं रिलेशनशिप अगदीच नवीन नसून त्यांना सध्या ते गुपितच ठेवायचं आहे अशीही चर्चा सुरु आहे.
दोघांनी आजपर्यंत एकाही सिनेमात काम केलेलं नाही. 'सन ऑफ सरदार २'च्या स्क्रीनिंगला त्यांना एकत्र पाहून दोघांचा सिनेमाही यावा अशी चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
मृणाल ठाकूरचं याआधीही काही अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं आहे. करिअरच्या सुरुवातीलाच ती शरद त्रिपाठीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर कुशाल टंडन, बादशाह, अरिजीत तनेजा, सिद्धांत चतुर्वेदीसोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं.