'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचे निळ्या रंगाच्या लेहंग्यातील अदा पाहून चाहते झाले घायाळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:01 PM2021-08-25T18:01:37+5:302021-08-25T18:06:35+5:30

माधुरी दीक्षितने निळ्या रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.

माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.

माधुरी दीक्षित बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

माधुरी दीक्षितने नुकतेच निळ्या रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.

माधुरी दीक्षितच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.

माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.

सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते.