'आश्रम'च्या बाबा निरालाच्या पत्नीसमोर पम्मी अन् बबिताही होतायेत फेल; पाहा बॉबी देओलच्या पत्नीचे Unseen photos

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:50 PM2022-08-12T15:50:27+5:302022-08-12T15:55:08+5:30

Bobby deol real life wife: सध्या सोशल मीडियावर बॉबीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. बॉबीची पत्नी कलाविश्वापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगते.

करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेला अभिनेता म्हणजे बॉबी देओल. एकेकाळी तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेल्या बॉबीचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, आश्रमच्या माध्यमातून त्याने धमाकेदार एन्ट्री केली.

सध्या बॉबी त्याच्या आश्रम या सीरिजमुळे प्रचंड चर्चेत येत आहे. या सीरिजमधील त्याच्या अभिनयाची नेटकऱ्यांकडून प्रशंसाही केली जात आहे.

बाबा निराला ही भूमिका साकारणारा बॉबी सध्या त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉबीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. बॉबीची पत्नी कलाविश्वापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगते.

बॉबीच्या पत्नीचं नाव तान्या असं असून ती सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही.

बॉबी कायम तान्यासोबतचे निवड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

बॉबी आणि तान्याचं लव्हमॅरेज असून एका पार्टीत त्यांची पहिली भेट झाल्याचं सांगण्यात येतं.

सौंदर्याच्या बाबतीत तान्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.

बॉबी कायम तान्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसतो.

बॉबीने शेअर केलेला तान्यासोबतचा सुंदर फोटो

बॉबी सध्या चांगलाच चर्चेत येत आहे.