Sanjay Dutt Birthday: संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त पहा त्याच्या बालपणीचे काही फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:39 PM2020-07-29T16:39:05+5:302020-07-29T16:39:05+5:30

आज 29 जुलैला बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तचा 61वा वाढदिवस साजरा करतो आहे.

अभिनेता संजय दत्तने आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने केजीएफ 2 चित्रपटातील त्याचा लूक लाँच करण्यात आला आहे.

संजयच्या वाढदिवसादिवशी अधीराचा लूक लाच करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी अधीराचा लूक असलेला स्केच सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होते.

सोशल मीडियावर संजय दत्त नेहमीच बालपणीचे फोटो शेअर करत असतो.

या फोटोंमध्ये संजय दत्त आपल्या आई वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसतो.

नुकतेच संजय दत्तने सुनील दत्त यांच्या 15व्या पुण्यतिथी निमित्त एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट केला होता.