सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:12 PM2023-05-30T15:12:54+5:302023-05-30T16:43:47+5:30

इस्लामसाठी फिल्मी करिअर सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता 'या' अभिनेत्रीचा समावेश

इस्लामसाठी सना खान, झायरा वसीम सारख्या अभिनेत्रींनी मनोरंजनसृष्टीला कायमचा रामराम केला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने निकाह झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली आहे.

भोजपुरी अभिनेत्री सबा खानने (Saba Khan) काही दिवसांपूर्वीच मनोरंजनसृष्टीत काम करणं बंद केलं होतं. आता तिने निकाह केला असून तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सबाने निकाहपूर्वीचा एक फोटो शेअर केला. यात तिने सिल्व्हर रंगाचा ब्राईडल लेहेंगा आणि ज्वेलरी परिधान केली होती. लग्नाच्या जोड्यात ती सुंदर दिसर होती. तसंच तिच्या चेहऱ्यावर आनंदही स्पष्ट दिसत होता.

आणखी एका फोटोत सबाने लाल आणि क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यातही ती राजकुमारीसारखीच रॉयल दिसत आहे. यावर तिने परिधान केलेले दागिनेही आकर्षक आहेत.

सबा खान नुकतीच कुठे तिच्या करिअरमध्ये यश मिळवत होती. मात्र अचानक तिने ग्लॅमर दुनियेतून कायमचा निरोप घेतला. इतकंच नाही तर तिने सोशल मीडियावरुन पोस्टही डिलीट केले.

सबा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हणाली होती की तिला इंडस्ट्रीत मोठं नाव कमवायचं आहे. इथे पोहोचण्यासाठी ती घरच्यांच्याही विरोधात गेली. पण आता तिने निकाह करण्याचा निर्णय घेतला.

सबाच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. तिच्यावर काही दबाव आहे का म्हणून तिने असा निर्णय घेतला अशीही शंका चाहत्यांनी व्यक्त केली आहे.