शाहरुख, सलमान ते रणवीर सिंग, AI ने तयार केला बॉलिवूड स्टार्सचा फॅट लूक, पाहा भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 07:24 PM2023-12-27T19:24:17+5:302023-12-27T19:46:36+5:30

बॉलिवूड सेलिब्रेटींचे फॅट लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. AI ने बॉलीवूडच्या काही फिट कलाकारांचा फॅट लूक तयार केला आहे. रोमान्स किंग शाहरुख खानचा AI ने फॅट लुक केला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद या फोटोमध्ये दिसत आहेत.

हृतिक रोशन बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. पण खरोखरचं तो जाड झाला तर कसा दिसेल हे दाखवण्याचा प्रयत्न AI ने केला आहे.

सलमान खान लठ्ठ झाला तर कसा दिसेल याची कल्पना करू शकता का? नसेल तर AI चा फोटो पाहून तुम्ही कल्पना करू शकता. तोही अचानक जाड झाल्यास कसा दिसेल हे दाखवण्याचा प्रयत्न AI ने केला आहे.

रणवीर सिंहचा AI ने फॅट लुक केला आहे.

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतो. पण, तोही अचानक जाड झाल्यास कसा दिसेल हे दाखवण्याचा प्रयत्न AI ने केला आहे.

'कमांडो' फेम अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सिनेमातील त्याने स्वत: केलेले स्टंट्स, अॅक्शन सीन्स तर थक्क करणारे असतात. अनेक तरुणी त्याच्या फिटनेसवर फिदा आहेत. पण हाच विद्युत अचानक जाड झाला तर कसा दिसेल असे AI च्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेससाठी आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून टायगर फॅट लुक समोर आला आहे.

एआयच्या (AI)माध्यमातून अभिनेता जॉन अब्राहम जाड झाल्यास कसा दिसेल हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या एआय फोटोंमध्ये वरुण धवन दिसत आहे. त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.