Maldives vs Lakshdweep Row: बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बिपाशाने गाठलं मालदीव, नेटकरी म्हणाले, "परत इकडे येऊ नको"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:47 AM2024-01-09T09:47:59+5:302024-01-09T10:08:32+5:30

मालदीवमध्ये बर्थडे साजरा करणारी बिपाशा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, चाहतेही नाराज

बिपाशा बासू ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकताच बिपाशाने तिचा ४५वा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा करण्यासाठी बिपाशाने पती करण सिंग ग्रोव्हर आणि लेक देवीसह थेट मालदीव गाठलं.

बर्थडे सेलिब्रेशनबरोबरच बिपाशाने मालदीव व्हॅकेशनचेही काही फोटो तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

पण, बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवमध्ये गेलेली बिपाशा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालदीवमध्ये असलेल्या बिपाशाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

तिच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. तर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये बिपाशाला सुनावलं आहे.

एकाने कमेंट करत "मालदीववरुन आता इकडे येऊ नको. असं पण तुझी इथे गरज नाही", असं म्हटलं आहे.

"मालदीव सरकारने आपला अपमान केला. आणि तू मालदीवमध्ये फिरत आहेस, तू तर देशद्रोही निघालीस," अशी कमेंटही केली आहे.

"सुजाण नागरिक बन आणि देशात काय चालू आहे, ते जाणून घे", अशा आशयाच्या कमेंटही केल्या आहेत.

"मालदीव रिसॉर्टचे फोटो पोस्ट करू नकोस", अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे.

लक्षद्वीप आणि मालदीववरुन सुरू असलेल्या वादादरम्यानच बिपाशाने मालदीवमध्ये बर्थडे साजरा केला. त्यामुळे बिपाशाला ट्रोल केलं गेलं आहे.