ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटियाच्या सौंदर्यांने चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 03:31 PM2023-09-20T15:31:35+5:302023-09-20T15:37:17+5:30

तमन्ना भाटियाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा सध्या साऊथ सोबतच बॉलिवूडमध्येही बोलबाला आहे. ती सध्या प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत आहे.

रजनीकांतच्या 'जेलर' सिनेमात ती झळकली. यातील तिच्या 'कावला' या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

नुकतेच अभिनेत्रीने जेलर' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत हजेरी लावली. यासाठी तिने खास लुक केला होता. काही स्टनिंग फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. यात तिची फिगर फ्लॉंट करत आहे. ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

काही दिवसांपुर्वीच 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये दिलेल्या इंटिमेट सीन्समुळेही तिची चर्चा झाली. शिवाय, कोस्टार विजय वर्मासोबत तिच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलंय.

जेलर व्यतिरिक्त तमन्ना भाटियाकडे अनेक प्रोजेक्ट्स लाइनअप आहेत. मल्याळममध्ये बांद्रा, तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये अरनमनाई 4 यातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती

तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.

काही तेलगू सिनेमात काम केल्यावर तिने हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. हिम्मतवाला, हमशकल्स, एंटरटेनमेंट' या चित्रपटात काम केले. पण तिला ओळख मिळाली ती सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.