बॉलिवूड अभिनेत्रीला दोन वेळा आलाय कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, 'आऊटडोरला तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:37 PM2023-10-02T13:37:16+5:302023-10-02T13:42:42+5:30

सिनेमाच्या शूटला दोन जणांनी तिला...

अभिनेत्री ईशा गुप्ताने (Esha Gupta) आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करते. ईशा सध्या फारशी चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडियाव अॅक्टिव्ह असते.

नुकतंच ईशाने इंडस्ट्रीत होत असलेल्या कास्टिंग काऊचवर भाष्य केलं आहे. ईशाला स्वत:ला अशा भयानक अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. एकदा एका फिल्ममेकरने तिच्याकडे सेक्शुअल फेवर मागितलं आणि तिने नकार दिला होता.

या घटनेबद्दल सविस्तर सांगताना ईशा म्हणाली,'सिनेमाचं शूट अर्ध पूर्ण झालं होतं. मी जेव्हा नकार दिला तेव्हा को-मेकरने मेकरला सांगितले की त्याला मला या फिल्ममध्ये बघायचंच नाही. मी सेटवर काय करत आहे? यानंतर काही मेकर्सने तर मला सिनेमात घ्यायलाही नकार दिला.

मी असं ऐकलं होतं लोक माझ्याबद्दल बोलतात की मी काही करणारच नाही तर मला सिनेमात घेऊन त्यांचा काय फायदा? पण नेहमीच अशा गोष्टींना नकार देत आले आहे.

आणखी एक घटना सांगताना ईशा म्हणाली,'एकदा आम्ही शूटिंगनिमित्त आऊटडोरला गेलो होतो. २ लोकांनी कास्टिंग काऊचचा प्लॅन केला होता. मी हे आधीच समजले होते. पण तरी मी सिनेमा करत होते.

त्यांना वाटलं आऊटडोर शूटला ते मला जाळ्यात ओढतील. पण मी सुद्धा हुशार आहे, मी तिथे रात्री एकटी झोपणार नाही असं सांगितलं. मी माझ्या फिमेल मेकअप आर्टिस्टला माझ्या खोलीत झोपायला बोलावलं.

ईशा असंही म्हणाली की, 'हे लोक स्टारकिड्ससोबत अशा गोष्टी करत नाहीत. कारण त्यांचे आईवडील त्यांना सोडणार नाहीत. त्या लोकांना वाटतं आम्हाला काम पाहिजे म्हणजे आम्हीही काहीही करायला तयार होतो.

ईशाला नुकतंच 'वन डे:जस्टिस डिलीव्हर्ड' मध्ये पाहिलं गेलं. तर आता ती 'देसी मॅजिक' मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे दीपक तिजोरीची 'टिप्सी' आणि 'हेरा फेरी 3' देखील आहे.