९० च्या दशकातील 'ही' बोल्ड अभिनेत्री ५ वर्षांनी करतेय कमबॅक; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:34 IST2025-11-07T15:18:21+5:302025-11-07T15:34:07+5:30

गोविंदा, संजय दत्तसोबत काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री ५ वर्षांनी अभिनयात कमबॅक करतेय. चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत

बॉलिवूडमधील अशा अनेक नायिका आहेत ज्या करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीमधून गायब होतात. त्यापैकी एक अभिनेत्री आता ५ वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करतेय

या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा बत्रा. पूजा बत्राने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

पूजा बत्राने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विरासत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पुढे तिने 'हसीना मान जाएगी', 'भाई', 'साजिश' आणि 'कही प्यार ना हो जाए' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

पूजा बत्रा शेवटची २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'स्क्वाड' या चित्रपटात दिसली होती. आता तब्बल ५ वर्षांनी पूजा बॉलिवूड नव्हे तर रशियन चित्रपटात झळकणार आहे.

'द मॅजिक लॅम्प' या रशियन चित्रपटाच्या माध्यमातून पूजा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

पूजा बत्राने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

त्यामुळ ९० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री पूजा बत्राला पाहायला तिचे चाहते उत्सुक आहेत. पूजाचा हा रशियन सिनेमा रिलीज कधी होणार, याबद्दल अद्याप माहिती नाही.