वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 04:09 PM2023-01-16T16:09:14+5:302023-01-16T16:20:30+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. त्याचे लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिले आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. त्याचे लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिले आहे.

अभिनेते कबीर बेदी हिंदी चित्रपटसृष्टीतील असे कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत खूप काम केले आहे. त्यांची गणना उत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते.

कबीर बेदी आज त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कबीर बेदी यांचा जन्म १६ जानेवारी १९४६ ला लाहोरमधील शीख कुटुंबात झाला. कबीर बेदी हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिले आहेत. त्यांनी चार लग्ने केली आहेत.

कबीर बेदी यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यांची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण चाहत्यांना सर्वात जास्त मोठा धक्का बसला जेव्हा कबीर बेदी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी चौथ्यांदा लग्न केले आणि त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या मैत्रिणीसोबत.

कबीर बेदी यांनी चार लग्न केली आहेत. कबीर बेदीच्या वादग्रस्त वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचे तर, त्यांनी पहिले लग्न १९६९ मध्ये ओडिसी नृत्यांगना प्रोतिमाशी केले. या लग्नापासून त्यांना पूजा बेदी आणि मुलगा सिद्धार्थ ही दोन मुले झाली.

पण नंतर परवीन बाबीसोबत कबीर बेदीची जवळीक वाढू लागली. अशा परिस्थितीत कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी यांच्या नात्यात अंतर आले. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. कबीर बेदींपासून विभक्त झाल्यानंतर प्रोतिमा यांचे निधन झाले.

परवीन बाबीमुळे, कबीर बेदींच्या पहिल्या लग्नात वादळ नक्कीच आले होते, पण कबीर बेदीचे अभिनेत्रीसोबतचे नातेही फार काळ टिकू शकले नाही. यानंतर ब्रिटीश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेजने कबीर बेदींच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांचे लग्न झाले. पण दोघांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि नंतर कबीर बेदी यांनी दुसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट घेतला.

कबीर बेदी जोडीदाराच्या शोधात होते. दुसरे लग्न मोडल्यानंतर कबीर बेदी यांनी १९९० मध्ये टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्कीसोबत तिसरे लग्न केले. पण लग्नाच्या १५ वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

पण लग्नाची प्रक्रिया इथेच थांबली नाही... तिसरे लग्न मोडल्यानंतर कबीर बेदींनी आपल्या ७० व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची गर्लफ्रेंड परवीन दोसांझसोबत चौथ्यांदा लग्न केले.

कबीर बेदी सुमारे दहा वर्षे परवीन दोसांझसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या नात्याला नवीन नाव दिले.

कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता.

कबीर बेदींनी त्यांचे मन ऐकले आणि आता ते त्यांच्या चौथ्या पत्नीसह आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.