पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:58 IST2026-02-16T15:46:39+5:302026-02-16T15:58:22+5:30

एका बॉलिवूड अभिनेत्रीने ५ वर्षांनी दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या रोमँटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

एका बॉलिवूड अभिनेत्रीने ५ वर्षांनी दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या रोमँटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दिया मिर्झा. अभिनेत्री दियाने २०२१ ला वैभव रेखीसोबत लग्न केलं. दियाने हे खास फोटो शेअर करुन आठवणी शेअर केल्या आहेत.

दियाने सोशल मीडियावर एक अतिशय हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पतीला 'घर' मानत तिने वैभवबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

एका महिला पंडिताने त्यांचे लग्न लावून दिले होते, ज्याची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तेव्हापासून हे जोडपे सोशल मीडियावर नेहमीच 'कपल्स गोल्स' देताना दिसते.

दियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर वैभवसोबतच्या काही सुंदर आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नापासून ते त्यांच्या मुलासोबतच्या (झ्यान) गोड क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.

"माझ्या आयुष्यातील सर्वात स्थिर आणि प्रेमाचे ठिकाण म्हणजे तू. वैभव, तूच माझं खऱ्या अर्थाने घर आहेस. आपल्या आयुष्यातील या सुंदर प्रवासासाठी आणि तू दिलेल्या प्रेमासाठी मी तुझी कायम ऋणी आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!", असं कॅप्शन दियाने या फोटोखाली दिलं आहे.

दिया आणि वैभव १५ फेब्रुवारी २०२१ रोजी एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकले होते. दियाने तिच्या लग्नात पर्यावरणाचे रक्षण आणि साधेपणाचा संदेश दिला होता.