"त्याने माझा विश्वासघात केला तरी मी...", १२ वर्षांनी संसार मोडल्यावर बरखाने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:06 IST2025-03-31T13:26:53+5:302025-03-31T14:06:21+5:30

बरखाला इंद्रनीलपासून एक मुलगीही आहे. ती एकटीच लेकीचा सांभाळ करत आहे.

लग्नानंतर १५ वर्षांनी २०२३ साली दोघांनी घटस्फोट घेतला आणि चाहत्यांना धक्काच बसला. इतकं गोड कपल विभक्त झालं यावर अनेकांना विश्वासच बसत नव्हता.

टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट (Barkha Bisht) आणि अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता (Indraniel Sengupta) हे लोकप्रिय कपल होतं. २००८ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले होते.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत बरखा म्हणाली, "इंद्रनीलने संसार मोडण्याचा निर्णय घेतला होता. याचं कारण त्याला माहित असावं. जर माझ्या हातात गोष्टी असत्या तर मी कधीच घटस्फोट घेतला नसता."

आता नुकतंच बरखा बिष्ट घटस्फोटावर व्यक्त झाली आहे. इंद्रनीलने तिचा विश्वासघात केला होता. तरीही ती लग्न टिकवण्यासाठी त्याच्यासोबत दोन वर्ष राहिली होती. मात्र तरी काहीच फरक न पडल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

"सगळं काही चांगलं चाललं होतं. पण माहित नाही काय झालं २०२१ मध्ये मला कळलं की इंद्रनील माझा विश्वासघात करत आहे. गेल्या चार वर्षांपासून मी हाच विचारत आहे की जर मी काही गोष्टीत कमीपणा घेतला असता तर कदाचित गोष्टी योग्य झाल्या असत्या. कदाचित असं झालं असतं तर तो माझ्याजवळ असता."

"माझा आत्मविश्वास शून्यावर गेला होता. आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले पण माझा आत्मविश्वास डगमगला नव्हता. पण मनाने खचणं म्हणतात ना ते मी अनुभवलं. माझा लोकांवरचा विश्वासच उडाला होता."

"मला वाटतं संसार नीट सुरु नसेल तर वेगळं व्हा पण एकमेकांचा विश्वासघात करु नका. जेव्हा पुरुषांचा विश्वासघात होतो तेव्हा त्यांना काय वाटतं मला माहित नाही पण जेव्हा तुम्ही एका महिलेला धोका देता तेव्हा ती खचून जाते. एक स्त्री सगळं काही सहन करु शकते पण विश्वासघात नाही."

बरखा आणि इंद्रनील 'प्यार के दो नाम एक राधा और एक श्याम' मालिकेच्या सेटवर भेटले होते. इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. काही वर्ष डेट केल्यानंतर 2008 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर बरखाने मुलीला जन्म दिला जिचं नाव मीरा आहे.