३०० पेक्षा जास्त जाहिराती केल्या, ४१ व्या वर्षी दिला बाळाला जन्म; कुठे आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:39 IST2024-11-21T13:28:47+5:302024-11-21T13:39:14+5:30
प्रेग्नंसीबद्दल म्हणाली, "या वयात आई होणं खूप अवघड..."

टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक महिला आहेत ज्या लग्नानंतर स्क्रीनपासून दूर गेल्या. अशा अभिनेत्री आज युट्यूब व्लॉगमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अशीच एक अभिनेत्री आहे आरती छाबरिया (Aarti Chabria). अक्षय कुमार, जॉन अब्राहमसोबत तिने काम केलं आहे. लग्नानंतर ती इंडस्ट्रीमधून गायबच झाली. तुम्हाला आठवली का ही अभिनेत्री?

आरती छाबरियाने २००१ साली 'लज्जा' सिनेमातून पदार्पण केलं होतं. तिने 'आवारा पागल दीवाना','शूटआऊट अॅट लोखंडवाला','हे बेबी' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०१३ साली ती 'वियाह 70 km' सिनेमात ती शेवटची दिसली.

आरती छाबरियाला खरी ओळख जाहिरातींमधून मिळाली. तिने ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत. आइस्क्रीम, फेस वॉशसह ३०० पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये तिने काम केलं.

२०१८ साली आरतीने ऑस्ट्रेलियातील टॅक्स कंसल्टंट विशारद बिडासीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियात शिफ्ट झाली आणि इंडस्ट्रीपासून दूर गेली.

आरती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रीय असते. वयाच्या ४१ व्या वर्षी ती आई झाली. यावर्षी मार्च महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नवा युवान असं ठेवलं आहे.

वयाच्या ४१ व्या वर्षी आई झाल्यावर आरती म्हणाली, "या वयात प्रेग्नंसी एवढी सोपी नसते जितकी विशी-तिशीत असते. माझ्यासाठी हा प्रवास खूप कठीण होता. आधी माझं मिसकॅरेजही झालं होतं. त्यामुळे योग्य वेळीच याविषयी बोलेन असा मी विचार केला होता. खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं."

















