पैशापेक्षाप्रशंसा महत्त्वाची

By Admin | Updated: October 20, 2014 02:00 IST2014-10-20T02:00:06+5:302014-10-20T02:00:06+5:30

ओम शांती ओम’ या २००७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी दीपिका पदुकोणची गणना आता चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते

Moneymaking Important | पैशापेक्षाप्रशंसा महत्त्वाची

पैशापेक्षाप्रशंसा महत्त्वाची

‘ओम शांती ओम’ या २००७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी दीपिका पदुकोणची गणना आता चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘पैशापेक्षा अभिनयाबद्दल होणारी प्रशंसा माझ्यासाठी मोठी बाब आहे,’ असे दीपिकाने सांगितले. चित्रपटातून अभिनयाची ताकद दाखविण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतो; परंतु अभिनयाची प्रशंसाच होत नसेल तर पैसा कमावून काय उपयोग, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. एक कलावंत म्हणून आम्हाला जी प्रतिष्ठा, प्रेम मिळते ते पैशापेक्षाही मौल्यवान असल्याचे दीपिकाचे म्हणणे आहे. माझा चित्रपट शंभर कोटींची कमाई करणार का दोनशे कोटीची, याचा विचार मी कधीच करीत नाही. ‘मी बॉक्स आॅफिस पाहून नव्हे, तर पटकथा पाहून चित्रपट स्वीकारते’ असेही तिने स्पष्ट केले.

Web Title: Moneymaking Important