मोहंजो दारो : कंटाळवाणी ऐतिहासिक कथा
By Admin | Updated: August 12, 2016 18:59 IST2016-08-12T18:55:22+5:302016-08-12T18:59:14+5:30
मोहंजो दारो किंवा मोहंजोदडो म्हणजे इतिहासाचा धडाच... खूप दीर्घ आणि झोप आणणारा. हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे, यात वादच नाही.

मोहंजो दारो : कंटाळवाणी ऐतिहासिक कथा
रेटिंग - 3/5
कलाकार: हृतिक रोशन, पूजा हेगडे, कबीर बेदी, अरुणोदय सिंग, नितीश भारद्वाज, किशोरी शहाणे
दिग्दर्शक: आशुतोष गोवारीकर
मोहंजो दारो किंवा मोहंजोदडो म्हणजे इतिहासाचा धडाच... खूप दीर्घ आणि झोप आणणारा. हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे, यात वादच नाही. कोणत्याही सर्वसाधारण हिंदी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आणि श्रेणीच्या दृष्टीने हा चित्रपट खूपच मोठा आहे. मोहंजोदडो किंवा मोहंजो दारो पर्वातील लोकांचे जीवन आणि काळ यांचे मोठेपण दर्शविणारा हा चित्रपट आहे, मात्र त्याचे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसे या ऐतिहासिक कथेचे यशस्वी रेखाटन केल्याचे दिसून येत नाही. मोहंजो दडो काळातल्या भाषेतील अर्थहीन उच्चारण काही मर्यादेत नुकसानकारक ठरते. उदाहरणार्थ हमलखोर याचा अर्थ पूर्वऐतिहासिक काळासंदर्भातील अपशब्द असू शकतो तर लक लक थोर म्हणजे आभार.
मोहंजोदडो ही सर्मन (हृतिक रोशन) याची कथा आहे. तो एक अनाथ बालक असून, आपले काका दुर्जन (नितीश भारद्वाज) आणि काकी ककीमा (किशोरी शहाणे) यांच्यासमवेत आमारी येथे राहत असतो. त्याला हे गाव सोडून शहरात म्हणजे मोहेंजोदडोला जावे लागते. काकांनी समजावून सांगितल्यानंतर सर्मन मोहंजोदडोला जाऊन नीळ विक्रीसाठी तयार होतो, मात्र हे शहर त्याच्या अपेक्षेनुसार नसते. तेथील क्रूर शासक महम (कबीर बेदी) लोभी असतो. गरिबांवर लादलेले कर, योग्य प्रशासनाचा अभाव यामुळे स्थानिक त्रासून गेलेले असतात. यातच महम हा चाणाक्षपणे शहरासाठी धरण बांधण्यास सुरुवात करतो. यामुळे नदीचे पात्र बदलून, शहराला लागणाऱ्या पाण्याची दुर्भिक्षता वाढणारी असते.
सर्मन हा स्थानिक पुजाऱ्याची मुलगी छानी हिच्या प्रेमात पडतो. पोपटासारख्या रंगाचे कपडे ती परिधान करीत असते. महमचा मुलगा मुंजा (अरुणोदय सिंग) याला देण्याचे ठरले असते. अपेक्षेप्रमाणे चित्रपटात सर्मन हा मोहंजोदडोमधील गरिबांसाठी गदा हातात घेतो आणि चुकीच्या कामासाठी विरोध करतो. सर्मनला यादरम्यान खूप अडथळे येतात. जबरदस्त मगरी, भुकेले नरभक्षक, भाड्याचे सैनिक छानीला त्याच्यापासून रोखण्यास तयार असतात. या काळात त्याला कुटुंबाच्या इतिहासाविषयी आणि या लोभी शहराच्या संबंधाविषयी माहिती मिळते. हे सगळे पापड तळल्यानंतर सर्मन, महापुरापासून या शहराचे रक्षण करण्यासाठी सर्व अभियांत्रिकी पावले उचलतो.
इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे हृतिक रोशन हा हिरो आहे. कबीर बेदी आणि अरुणोदय सिंग यांनी विशिष्ट पद्धतीच्या खलनायकाचे काम केले आहे. या चित्रपटात पूजा हेगडेला छान छान कपडे आणि वेगवेगळे मुकूट परिधान करण्यापलीकडे काही काम नाही.
चित्रपटाची कथा साधी साहसिक आहे, मात्र त्याला सांस्कृतिक मुलामा देण्यात आल्याने त्याचा बाज हरविला आहे. समकालीन शहरे, राजकीय वाद, भ्रष्टाचार, शहरांचे चुकीचे नियोजन, लोकांचे शोषण हे नेहमीचेच चर्चेचे विषय राहिले आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याने जमेल तेवढा या विषयाला न्याय देण्याचा त्याच्यापरीने प्रयत्न केला आहे. मोहंजोदडोमध्ये कथेला संपन्न बनविण्याऐवजी कथा सांगण्याचा प्रयत्न अधिक करण्यात आला आहे. विचित्र शब्द वापरून भाषेचे अधिक मातेरे झाले आहे. भडकावू व्हीएफएक्स, गोवारीकर यांचे स्वत:च्या चित्रपटातील अर्धा डझन संदर्भ यामुळे हा विषय क्लिष्ट झाला आहे.
एकूणात तुम्हाला या आठवडाअखेर हा चित्रपट पाहावयाचा असेल तर रुस्तमपेक्षा मोहेंजोदडो हा चांगला आहे. परंतु तुम्हाला पाहायचाच नसेल तर, तुम्हाला बरेच काही चुकल्यासारखेही वाटणार नाही.