‘साला खडूस’वर ‘मस्तीजादे’ची मात

By Admin | Updated: February 2, 2016 01:22 IST2016-02-02T01:22:09+5:302016-02-02T01:22:09+5:30

बॉक्स आॅफिसवरही अर्थतज्ज्ञ ग्रेसम यांच्या नियमाची प्रचिती आली. ‘साला खडूस’ या चित्रपटावर मात करीत, ‘मस्तीजादे’ या चित्रपटाला व्यावसायिकदृष्ट्या चांगले यश मिळाले.

'Mastijade' overcome on 'Saala Khados' | ‘साला खडूस’वर ‘मस्तीजादे’ची मात

‘साला खडूस’वर ‘मस्तीजादे’ची मात

बॉक्स आॅफिसवरही अर्थतज्ज्ञ ग्रेसम यांच्या नियमाची प्रचिती आली. ‘साला खडूस’ या चित्रपटावर मात करीत, ‘मस्तीजादे’ या चित्रपटाला व्यावसायिकदृष्ट्या चांगले यश मिळाले. तडफदार बॉक्सिंग कोच आणि एका अल्लड मुलीला बॉक्सिंग चॅम्पियन बनविण्याच्या कथानकावर आधारित, राजकुमार हिराणी यांनी एकाच वेळी हिंदी आणि तामिळ या दोन्ही भाषेत ‘साला खडूस’ चित्रपट प्रदर्शित केला.
हिंदीतील चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ३.३७ कोटींचा गल्ला कमावला. तथापि, ही कमाई अपेक्षेनुसारच कमीच ठरली. दुसरीकडे मात्र, ‘मस्तीजादे’ने ११ कोटींपेक्षा अधिक कमाई केली. प्रदर्शित झाल्यापासून ‘मस्तीजादे’ जोमात होता. या चित्रपटाची कमाई पहिल्याच दिवशी ५ कोटींची, तर ‘साला खडूस’ची कमाई एक कोटी होती.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, सकारात्मक प्रतिक्रियांचा ‘साला खडूस’ला फायदा होऊ शकतो. दरम्यान, आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ कोटींची उड्डाणे घेत, ‘१००
कोटी क्लब’मध्ये पोहोचला
आहे.
या क्लबमध्ये स्थान मिळविणारा अक्षय कुमारचा हा चौथा चित्रपट होय. ‘क्या कूल हैं हम’ या चित्रपटाला मात्र फारसे यश लाभले नाही. अवघी ३० कोटींचीच कमाई या चित्रपटाला करता आली.
येत्या शुक्रवारी दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सनी देओल ‘घायल रिटर्न’ चित्रपटाने
दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करीत आहे, तसेच दोन नवीन चेहरे असलेला ‘सनम तेरी कसम’ प्रदर्शित होत आहे.

 

Web Title: 'Mastijade' overcome on 'Saala Khados'