झक्कास! गुलाबी रंगाच्या साडीत नटली प्रियांका तेंडोलकर; हटके फॅशनची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:03 PM2024-05-27T17:03:24+5:302024-05-27T17:10:27+5:30

'ठरलं तर मग' मालिका फेम प्रियांका तेंडोलकरचा मनमोहक अंदाज पाहा.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच उचलून घेतलंय.

या मालिकेतील अर्जुन- सायली प्रमाणेच प्रत्येक पात्राने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

'ठरलं तर मग' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रियाने देखील प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.

'फुलपाखरू', 'साथ दे तू मला' यांसारख्या मालिकांमध्ये काम करत प्रियाने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

प्रियांका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

नुकतेच तिने एका लग्नसमारंभात परिधान केलेल्या साडीतील काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

कानात डौलदार झुमके, फिकट गुलाबी रंगाची साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तिने घातला आहे.

करवली प्रियांका या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

"I know i look exhausted... I was bride MAID" असं कॅप्शन तिने या व्हायरल फोटोंना दिलं आहे.