दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:45 IST2024-10-31T12:45:16+5:302024-10-31T12:45:59+5:30

परेश मोकाशींच्या वडिलांचं निधन झालंय. परेश यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णांनी सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे

vaalvi fame director Paresh Mokashi father passed away Madhugandha kulkarni emotional post | दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."

दिग्दर्शक परेश मोकाशींना पितृशोक! मधुगंधाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली - "झोपल्या झोपल्या..."

'वाळवी', हरिश्चंद्राची फॅक्टरी,  नाच गं घुमा अशा लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शक परेश मोकाशींच्या वडिलांचं निधन झालंय. परेश यांची पत्नी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट करुन ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली. मधुगंधा यांनी सासऱ्यांचा फोटो शेअर करुन लिहिलंय की, "माझं लग्न होईपर्यंत माझ्या जिभेला ‘ बाबा ‘ अशी हाक मारायचं वळणाच नव्हतं. माझे बाबा मी अडीच वर्षाची असताना गेले. माझ्या बालपणात , तरुणपणात ती जागा रिक्तच होती.. माझं लग्न झालं आणि बाबा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात..."

मधुगंधा पुढे लिहिते, "नात्यानं तुम्ही सासरे...पण बापाची माया तुमच्यामुळे कळली मला. आमच्या अफेअर पासून तुम्ही मला मुलगी केलंत आणि परेशला जावई .तुम्हाला सगळ्या गोष्टीत रस आणि सगळ्यामध्ये सपोर्ट करण्याची भावना.. हरिश्चंद्र ची फॅक्टरी असो... एलिझाबेथ एकादशी असो ...तुम्ही सदैव पाठीशी उभे राहिलात..तुम्ही नसता तर कदाचित हे चित्रपट झालेही नसते . तुमचं हसणं लहान मुला सारखं होत..निरागस ..निर्मळ..किती वाचन , किती ज्ञान ..जगाचा इतिहास असो की भूगोल ..की असो खगोल सगळं तुम्हाला मुखोद्गत.. सगळे धंदे, सगळ्या कलांमध्ये तुम्हाला किती कुतूहल..किती रस... बाबा तुमच्या सारखा स्त्रीवादी, शांत , विवेकी पुण्यवान आणि विरक्त माणूस मी पहिला नाही.."



मधुगंधा शेवटी लिहितात की, "तुमचे शब्द मनात घुमत राहतील ...तुमचा लाफ्टर कानात उमटत राहील .. माझा कुणाला त्रास नको...हे ब्रीद वाक्य..
झोपल्या झोपल्या वेगळा प्रवास अरंभालात .. तुम्ही तिकडेही असेच शांत, आनंदी आणि विरक्त पोचले असाल. माझं मात्र मन विषण्ण आहे . बाबा , मी तुम्हाला आयुष्यभर मिस करत राहीन.."

Web Title: vaalvi fame director Paresh Mokashi father passed away Madhugandha kulkarni emotional post