9 महिने जिममध्ये घाम गाळल्यानंतरचा रिझल्ट! सोनाली कुलकर्णीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 10:32 IST2021-09-26T10:31:35+5:302021-09-26T10:32:56+5:30

9 महिन्यांची वेट लॉस जर्नी; पाहा VIDEO

sonalee kulkarni share her wieght loss video loss 9 kg in few months | 9 महिने जिममध्ये घाम गाळल्यानंतरचा रिझल्ट! सोनाली कुलकर्णीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

9 महिने जिममध्ये घाम गाळल्यानंतरचा रिझल्ट! सोनाली कुलकर्णीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी ( Sonalee  Kulkarni) या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या फिटनेसची. होय, लॉकडाऊनमुळे सक्तीची विश्रांती झाली. मग लग्न, हॉलिडे अशात वजन काहीसं वाढलं होतं. पण आता ही अप्सरा तिच्या जुन्या आधीसारखी दिसू लागली आहे. अर्थात यामागे 9 महिन्यांची मेहनत आहे. नऊ महिने जिममध्ये घाम गाळल्यानंतरचा हा रिझल्ट आहे.
सोनालीने जानेवारी महिन्यात वेट लॉट सुरू केलं होतं. सप्टेंबर अखेर म्हणजे गेल्या नऊ महिन्यांत तिने 9 किलो वजन घटवलं. सोनालीने फॅट लॉस व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तिने तिची 9 महिन्यांची वेट लॉस जर्नी दाखवली आहे.

यात सोनाली बॉक्स जम्प मारताना दिसतेय. वेट लॉस जर्नी सुरू करण्याआधीची सोनाली आणि आत्ताची सोनाली यात दिसते. अगदी सुरूवातीला ती जरा वेगळी दिसते. पण त्यानंतर तिच्यातील फरक आश्चर्यचकित करतो.

सोनालीचा वेट लॉस आफ्टर अ‍ॅण्ड बिफोर असा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक चाहत्यांनी सोनालीच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. क्रांती रेडकर, प्रिया बापट व अन्य मराठी अभिनेत्रींनीही तिचं कौतुक केलं आहे.

काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्यी चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.
संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला.

Web Title: sonalee kulkarni share her wieght loss video loss 9 kg in few months