अखेर ‘पुष्पक विमान’वरील पडदा उठला, सिनेमाचं पोस्टर रिलीज, मोहन जोशीच आजोबांच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:08 IST2018-06-28T15:03:50+5:302018-06-28T15:08:57+5:30

आजोबा-नातवाच्या नातेसंबंधांवर आधारित हा सिनेमा ३ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Pushpak Viman Poster out, its confirmed Mohan joshi in grand father Role | अखेर ‘पुष्पक विमान’वरील पडदा उठला, सिनेमाचं पोस्टर रिलीज, मोहन जोशीच आजोबांच्या भूमिकेत

अखेर ‘पुष्पक विमान’वरील पडदा उठला, सिनेमाचं पोस्टर रिलीज, मोहन जोशीच आजोबांच्या भूमिकेत

ठळक मुद्दे'पुष्पक विमान' ३ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे. दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनी सुबोध भावेने 'पुष्पक विमान' या सिनेमाची घोषणा केली.


'कट्यार काळजात घुसली' या सिनेमानंतर अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे ‘पुष्पक विमान' घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. खुद्द सुबोधने सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता सुबोध भावे आणि मोहन जोशी पाहायला मिळत आहेत. याआधी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ४१ सेकंदाच्या टीझरमध्ये कलाकार, मुख्य भूमिका याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र टीझरमधील कलाकाराच्या आवाजावरुन ते मोहन जोशीच असणार अशी रसिकांमध्ये चर्चा होती. अखेर पोस्टर रिलीज झाल्यानंतर या गोष्टीवरुन पडदा उठला असून यांत सुबोध भावेसह मोहन जोशींची मुख्य भूमिका असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आजोबा-नातवाच्या नातेसंबंधांवर आधारित हा सिनेमा ३ ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पक विमान' हा सुबोधने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा आहे. सुबोध भावेसोबत या सिनेमाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकरनेही केले आहे. 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' यांसारख्या सिनेमातून सुबोधने आपल्या अभिनयातील ताकद दाखवून दिली होती. उत्तम कलाकार असण्यासह तो एक प्रतिभावंत दिग्दर्शक असल्याचे दाखवून दिले होते. त्याने दिग्दर्शित केलेल्या कट्यार काळजात घुसली' सिनेमाला रसिकांनी आणि समीक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या सिनेमासाठी सुबोधने केलेल्या दिग्दर्शनाचे चांगलेच कौतुक झाले होते. आता सुबोधच्या पुष्पक विमान रसिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं रंजक ठरेल.


दादासाहेब फाळके यांच्या जयंती दिनी सुबोध भावेने 'पुष्पक विमान' या सिनेमाची घोषणा केली. 'कट्यार काळजात घुसल' या सिनेमानंतर सुबोध दिग्दर्शित करत असलेला हा दुसरा सिनेमा आहे. 'संत तुकाराम यांच्यावर' या सिनेमाची कथा बेतलेली आहे. आजवर संत तुकारामांवर दोन सिनेमा येऊन गेले आहेत. पहिल्या सिनेमात विष्णुपंत पागनीस यांनी तुकारामाची भूमिका केली होती. दुस-या सिनेमात अभिनेता जितेंद्र जोशीने संत तुकारामांची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता सुबोधच्या पुष्पक विमान या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. 
 

Web Title: Pushpak Viman Poster out, its confirmed Mohan joshi in grand father Role