तेजस्विनी लोणारीशी लग्न केल्यानंतर समाधान सरवणकर यांची पहिली पोस्ट, म्हणाले- "आयुष्याच्या प्रवासात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:01 IST2025-12-05T11:56:42+5:302025-12-05T12:01:39+5:30
तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांचं काल लग्न झालं. अभिनेत्रीशी लग्न केल्यावर समाधान सरवणकर यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे

तेजस्विनी लोणारीशी लग्न केल्यानंतर समाधान सरवणकर यांची पहिली पोस्ट, म्हणाले- "आयुष्याच्या प्रवासात..."
काल ४ डिसेंबरला तेजस्विनी लोणारीचं समाधान सरवणकर यांच्याशी थाटामाटात लग्न झालं. तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर काल पारंपरिक थाटात तेजस्विनी आणि समाधान आणि एकमेकांशी लग्नगाठ बांधली. तेजस्विनीशी लग्न केल्यानंतर समाधान यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट लिहिली आहे.
तेजस्विनीशी लग्न झाल्यावर समाधान काय म्हणाले?
तेजस्विनी लोणारीसोबतचा लग्नाचा फोटो समाधानने शेअर केला आहे. या फोटोत तेजस्विनी आणि समाधानसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंबही दिसतंय. हा फोटो शेअर करुन समाधान लिहितो, ''आयुष्याच्या या सुंदर प्रवासात, एकमेकांना साक्ष देऊ, सुख-दुःखाच्या प्रत्येक वळणावर, एकमेकांची साथ देऊ, !'', असं छोटंसं कॅप्शन लिहून समाधान सरवणकर यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. समाधान आणि तेजस्विनीच्या भावी आयुष्यासाठी चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तेजस्विनी-समाधान यांच्या लग्नाचा थाट
२६ ऑक्टोबर रोजी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर काल ते दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नात तेजस्विनीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. वधूच्या गेटअपमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर समाधान यांनी ऑफव्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. या लग्नात राजकीय पक्षातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि इंडस्ट्रीतील कलाकार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लग्नाला हजेरी लावली होती.