नाना पाटेकरांसोबत दिसणाऱ्या 'या' ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला ओळखलं? साजरा केला ९१ वा वाढदिवस
By देवेंद्र जाधव | Updated: November 6, 2025 14:22 IST2025-11-06T14:17:09+5:302025-11-06T14:22:29+5:30
नाना पाटेकर आणि भारती आचरेकर यांनी त्यांच्या गुरुंचा ९१ वा वाढदिवस साजरा केला. तुम्ही फोटोतील या ज्येष्ठ अभिनेत्रीला ओळखलं?

नाना पाटेकरांसोबत दिसणाऱ्या 'या' ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला ओळखलं? साजरा केला ९१ वा वाढदिवस
नाना पाटेकर हे मराठी - हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारे लोकप्रिय अभिनेते. नानांना आपण विविध सिनेमांतून अभिनय करताना पाहिलंय. नाना पाटेकर आज लोकप्रिय अभिनेते असले तरी त्यांना अभिनय क्षेत्रात आणण्यासाठी एका मोठ्या अभिनेत्रीचा हात होता. नाना पाटेकर या अभिनेत्रीला त्यांच्या गुरु मानतात. नाना पाटेकर आणि अभिनेत्री भारती आचरेकर त्यांच्या याच गुरुचा ९१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळचा अनुभव भारती यांनी शब्दबद्ध केला आहे.
नाना पाटकरांसोबत दिसणारी ही अभिनेत्री कोण?
नाना पाटकरांच्या फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे विजया मेहता. विजया मेहता या मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री आहेत. नीना कुळकर्णी, भारती आचरेकर, नाना पाटेकर असे अनेक दिग्गज विजयाबाईंच्या तालमीत घडले आहेत. या सर्व नटांनी सुरुवातीच्या काळात विजया मेहतांकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. विजया मेहतांनी डॉ. श्रीराम लागू, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांच्यासोबत रंगायन नावाचा थिएटर ग्रुप निर्माण केला होता. विजया मेहतांनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटकं खूप गाजली. आजही ही नाटकं आणि विजयाबाईंची दिग्दर्शकीय शैली तरुण पिढीसाठी आदर्श आहे.
भारती आणि नाना पाटेकर विजयाबाईंचा ९१ वा वाढदिवस साजरा करायला गेले होते. त्यावेळी भारती आचरेकर लिहितात, ''काल ४ नोव्हेंबर, आमच्या गुरु लाडक्या विजयाबाईंचा ९१ वा वाढदिवस होता.. सकाळी सकाळी नानाचा फोन आला, "मी बाईंकडे जातोय तू पण ये.. माझं शूट दुपारी होत.. गुच्छ घेऊन गेले.. नानाने दादर मार्केट मधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फूल आणली होती .. सबंध घरभर २० एक फ्लॉवरपॉटमध्ये इतकी सुरेख लावली त्यातच मग्न होता तो.. मी म्हटलं नान्या गणपतीची आठवण आली तर म्हणाला अगं विजयाबाई आपला गणपतीच आहे...खूप कौतुक वाटल त्याचं..बाई पण खूप आनंदात होत्या..''