मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीनं या अभिनेत्यासोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, लग्नाचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:36 PM2022-08-17T12:36:05+5:302022-08-17T12:36:51+5:30

Neha Joshi Wedding : अभिनेत्री म्हणजे नेहा जोशीने गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Marathmoli actress Neha Joshi secretly tied the knot with this actor, wedding photo went viral | मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीनं या अभिनेत्यासोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, लग्नाचे फोटो झाले व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीनं या अभिनेत्यासोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, लग्नाचे फोटो झाले व्हायरल

googlenewsNext

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी (Neha Joshi). नुकतेच नेहाने गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे समोर आले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने लग्न कोणासोबत केले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर तिने अभिनेता ओमकार कुलकर्णीसोबत लग्न केले आहे. 

अभिनेत्री नेहा जोशी हिने अभिनेता ओमकार कुलकर्णीसोबत १६ ऑगस्ट रोजी खासगी सेरमनीत लग्नबेडीत अडकली आहे. तिने लग्नाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, अखेर अडकले विवाहबंधनात.

तसेच नेहाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अंतरपाट पकडलेला असून ती कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की आयुष्यातील नवीन भूमिका. 

नेहा आणि ओमकारने साधेपणाने लग्न केले असून मीडिया रिपोर्टनुसार, ते कोर्ट मॅरेज करून छोटेसे रिसेप्शन ठेवणार आहेत. नेहा आणि ओमकारच्या लग्नाच्या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री नेहा जोशीचा नवरा ओमकार कुलकर्णी हा मुळात एक लेखक, कवी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नेहा ३८ वर्षांची आहे, तर ओमकार तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे. ओमकार यापूर्वी एका महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापकही होता.

अभिनेत्री नेहा जोशीने पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Marathmoli actress Neha Joshi secretly tied the knot with this actor, wedding photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.