"झिम्मा २ कमाल आणि धम्माल अविष्कार...", अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:43 AM2023-11-25T11:43:52+5:302023-11-25T11:44:09+5:30

Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बायका कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता 'झिम्मा २'मध्ये पाहायला मिळत आहे.

"Jhimma 2 Kamal and Dhammaal Aviskar...", actor Ankush Chaudhary's post in discussion | "झिम्मा २ कमाल आणि धम्माल अविष्कार...", अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

"झिम्मा २ कमाल आणि धम्माल अविष्कार...", अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बायका कधी कशा व्यक्त होतील याचा काही नेम नसतो. अशाच विविध तऱ्हा असणाऱ्या, व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र धम्माल होते. अशीच धमाल आता 'झिम्मा २'मध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मीडियावरही झिम्मा २चा बोलबाला पाहायला मिळत आहे. दरम्यान आता झिम्मा २ चित्रपटाबद्दल अभिनेता अंकुश चौधरी याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेता अंकुश चौधरीने इंस्टाग्रामवर झिम्मा २चे पोस्टर शेअर करत लिहिले की, झिम्मा २ कमाल आणि धम्माल अविष्कार.. सगळ्याजणी एकापेक्षा एक.. हसवतात आणि रडवतात सुद्धा..शेवटी खुप काही सांगून जातात.. खुप प्रेम.. UNO UNO UNO… झिम्मा २. त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


झिम्मा २ चित्रपटात कबीर पुन्हा एकदा टूरचं आयोजन करतो आणि पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही या चित्रपटातील नायिका लंडन टूरवर निघतात. निर्मला, वैशाली, मीता, तान्या, मनाली यांना घेऊन कबीर लंडनला पोहोचतो. तिथे इंदू, कृतिका आणि अॅलीस्टर त्यांची वाटच बघत असतात. इंदूचा वाढदिवस सर्वजण सेलिब्रेट करतात. नदीवर मासेमारी करण्याकरता जातात. अचानक इंदूला पोहोचण्याची इच्छा होते. इंदू सर्वांचा डोळा चुकवून पाण्यात उतरते. त्यानंतर पुढे काय घडतं हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चिलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २' येत्या २४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: "Jhimma 2 Kamal and Dhammaal Aviskar...", actor Ankush Chaudhary's post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.