डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक देणार सरप्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 15:42 IST2016-12-21T15:40:19+5:302016-12-21T15:42:00+5:30

मिहीर राजदा लिखीत आणि अव्दैत दादरकर दिग्दर्शित डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक रंगभूमीवर गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Do not Worry Be Happy Happy Playing? | डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक देणार सरप्राईज?

डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक देणार सरप्राईज?

हीर राजदा लिखीत आणि अव्दैत दादरकर दिग्दर्शित डोन्ट वरी बी हॅपी हे नाटक रंगभूमीवर गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रासहित परदेशातदेखील झाले आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसत आहे. नाटकांविषयीची प्रेक्षकांची ही उत्सुकता पाहता अभिनेत्री स्पृहा जोशी आणि उमेश कामत प्रेक्षकांना या नाटकाच्या माध्यमातून काहीतरी सरप्राईज देणार असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. हे सरप्राइज ते ख्रिसमसच्या मुहुर्तावर देणार असे वाटत आहे. कारण नुकतेच त्यांनी सोशलमीडियावर सांताक्लॉज टोपी घालून एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर एक सरप्राइज असल्याचे आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांनादेखील या नाटकाविषयीच्या सरप्राइजची उत्सुकता लागली आहे. तसेच त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट ही टीव्ही मालिका आणि पेइंग घोस्ट या चित्रपटानंतर आता उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडी डोन्ट वरी बी हॅपीच्या माध्यमातून प्रेक्षकांना रंगभूमीवर दिसत आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेदेखील आनंदी आहेत. तसेच या  नाटकात स्पृहा आणि उमेश नवरा-बायकोच्या भूमिकेत आहेत. तसेच नाटक आजच्या पिढीचं आहे. आपल्या करीयर मागे धावणारे नवरा-बायको कसे कामाच्या व्यापात गुरफटून जातात, की त्यांना स्वत:च आयुष्यच उरत नाही. एकमेकांवर प्रेम असूनही त्यांच्या आयुष्यातला रोमँस संपतो, फॅमिली पूढे वाढतं नाही. आणि नात्यात उगाच तणाव येतो. अशावेळेस सगळं उमजतं असलेले ते दोघं एकमेकांच्या जवळ येण्यासाठी कसे सर्वतोपरी प्रयत्न करतायत. तरीही त्यांची होणारी चिडचिडी ते थांबवू शकत नाही. असा साधारण नाटकाचा गाभा आहे. ही कथा आपल्या पिढीतल्या प्रत्येक नवरा-बायकोची आहे. त्यामुळे ती आजच्या पिढीला नक्की आवडेल. अशी ही त्यांच्या प्रेमाची ही तिसरी कथा प्रेक्षकांना या नाटकातून पाहता येणार आहे. त्यामुळे आता ही जोडी काय सरप्राइज देणार आहेत यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. 



 

Web Title: Do not Worry Be Happy Happy Playing?