प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार बनणार दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:28 IST2017-01-06T17:28:17+5:302017-01-06T17:28:17+5:30

     बेनझीर जमादार मराठी चित्रपटसृष्टीमध्ये यंदा प्रेक्षकांचे लाडके कलाकार लघुपटाच्या प्रेमात पडलेले दिसतात. कारण, २०१७ मध्ये बरेच कलाकार ...

The director will become the favorite artist of the audience | प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार बनणार दिग्दर्शक

प्रेक्षकांचे हे लाडके कलाकार बनणार दिग्दर्शक

 
 बेनझीर जमादार


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये यंदा प्रेक्षकांचे लाडके कलाकार लघुपटाच्या प्रेमात पडलेले दिसतात. कारण, २०१७ मध्ये बरेच कलाकार हे लघुपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहेत. अभिनयासोबतच हे कलाकार दिग्दर्शनातदेखील आपला ठसा उमटविणार आहेत. अशाच काही कलाकारांचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला हा आढावा. 



१. पुष्कराज चिरपुटकर - दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा अभिनेता लवकरच एक लघुपट दिग्दर्शन करणार असल्याचे कळते. त्याच्या या लघुपटामध्ये अभिनेता अमेय वाघ याचादेखील सहभाग असल्याचे कळते. मात्र, त्याच्या या लघुपटाचे नाव अदयापदेखील कळाले नाही. 



२. शिवानी रांगोळे - ही अभिनेत्री सध्या एका मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शिवानीने सध्या एका कथेचे लिखाण केले आहे. ती तिच्या या कथेवर लघुपट करणार असल्याचे कळते. त्याचे दिग्दर्शन ती स्वत: करणार आहे का हे अद्यापदेखील गुलदस्त्यात आहे.  या मालिकेनंतर ती तिच्या या लघुपटावर फोकस करणार असल्याचे समजते. 



३. प्रथमेश परब - टाइमपास या चित्रपटाच्या माध्यमातून या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक लघुपट दिग्दर्शित केला होता. आता तो यंदा आणखी एक लघुपट दिग्दर्शन करणार असल्याचे समजते. त्याचा हा लघुपट कोणत्या कथेवर आधारित असणार आहे हे अजूनदेखील कळाले नाही.



४. नेहा जोशी - का रे दुरावा या मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेत ही या अभिनेत्री सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. आता ही अभिनेत्री लवकरच एका लघुपटाच्या सहनिर्मितीची जबाबदारी पार पाडणार आहे. तिच्या या लघुपटाचे नाव उकळी असे आहे. तिच्यासोबत या लघुपटासाठी अभिनेत्री विभावरी देशपांडेदेखील सहनिर्मिती असणार आहे. 

Web Title: The director will become the favorite artist of the audience